ठळक बातम्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य‌ आणि हार्बर मार्गावर १२ विशेष लोकल फे-या

लांब पल्ल्यांच्याही १४ गाड्या चालविणार

मुंबई दि.०१ :- डॉ.‌ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त येत्या ६ डिसेंबरला मध्य आणि हार्बर मार्गावर १२ विशेष लोकल फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.‌

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आणि मध्य व पश्चिम रेल्वेचे व्यवस्थापक, अधिका-यांचीह बैठक बुधवारी झाली.‌

त्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. विशेष लोकल फे-यांसह लांब पल्ल्यांच्या १४ गाड्याही चालविण्यात येणार असून आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेसला एक अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *