महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहितीपत्रकाचे राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई दि.३० :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी मुंबई येथे येणाऱ्या अभ्यागतांसाठी तयार करण्यात आलेल्या सुचना आणि माहिती पत्रक तसेच भित्तीपत्रकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले.
राजभवन, मुंबई येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आणि अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.