मुंबई विभागीय पारपत्र कार्यालय येत्या ३ डिसेंबर रोजी सुरू राहणार
मुंबई दि.३० :- मुंबई विभागीय पारपत्र कार्यालय (आरपीओ) येत्या शनिवारी, ३ डिसेंबर रोजी सुरू राहणार आहे. या दिवशी वेळ निश्चित करण्यासाठी बुधवारपासून (३० नोव्हेंबर) अर्ज करता येतील. आरपीओ मुंबईची सर्व कार्यालये पारपत्र अर्जांच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शनिवार, ०३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ५.३० या वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहेत.
यापूर्वी भेटीची वेळ मिळालेली असताना त्यावेळी उपस्थित राहू न शकलेले नागरिकही शनिवारी वेळ निश्चित करू शकतील. तसेच ३ डिसेंबरनंतर ज्यांना कार्यलय भेटीची वेळ मिळाली आहे. त्यांनाही शनिवारी वेळ निश्चित करता येईल. मात्र, नियोजित वेळ बदलून घेण्याची ही एकच संधी नागरिकांना मिळेल. नागरिकांनी https://www.passportindia.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करून शुल्क भरावे.