राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणा-या चित्रपटांचे प्रोत्साहन अनुदान दुप्पट
मुंबई दि.३० :- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विभागात पुरस्कार मिळविणा-या मराठी चित्रपटांनाना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली. चित्रपट उद्योगातील चित्रपट, टिव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्म निर्माते, तंत्रज्ञ यांच्या समस्यांबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार विजेते चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे आणि या चित्रपट निर्मात्यांनी भविष्यात अधिक चांगल्या सिनेमाची निर्मिती करावी हा उद्देश आहे. मराठी चित्रपटांना प्रतिष्ठा आणि प्राईम स्लॉट मिळावा यासाठी महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स मालकांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.