गड- किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
सातारा दि.३० :- छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणा देणारा असून महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येथे केली.
शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने प्रतापगडावर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या प्राधिकरणांतर्गत गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम केले जाईल. त्यासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात येईल. निधीची कमतरता भासणार नाही. तसेच आगामी काळात गड-किल्ल्यांवरील सर्व अतिक्रमणे आगामी काढण्यात येतील, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.