लिपिक, टंकलेखक रिक्त पदांसाठीची जाहिरात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात
मुंबई दि.३० :- राज्यातील लिपिक, टंकलेखक या सर्व रिक्त पदांची जाहिरात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. येत्या १५ डिसेंबपर्यंत राज्यातील सर्व विभागांच्या रिक्त पदांचा तपशील गोळा करून त्यानुसार मागणी असलेल्या पदांचा तपशील राज्य लोकसेवा आयोगाला कळवावा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत राज्यात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत भरतीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी पदभरतीसंदर्भात १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले.