फाळणीचे रक्तबंबाळ वास्तव ‘घायाळ’ नाटकातून उलगडणार
डोंबिवली दि.२९ :- संस्कार भारती कोकण प्रांत आणि डोंबिवली कल्याण जिल्हा समितीतर्फे येत्या ४ डिसेंबर रोजी डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाटय़गृहात ‘घायाळ’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ लेखक, पत्रकार पु भा भावे यांनी फाळणीच्या अनुभवावर ज्या कथा लिहिल्या होत्या त्या कथांचे नाट्यरूप म्हणजे ‘घायाळ’ हे नाटक आहे. फाळणी नंतरचे रक्तबंबाळ, क्रूर अत्याचार ‘घायाळ’ मधून उलगडले जाणार आहेत.
सकाळी साडेदहा वाजता सादर होणा-या ‘घायाळ’ नाट्यप्रयोगाचे स्वागतमूल्य फक्त ५० आणि १०० रुपये इतके आहे. पु. भा. भावे यांच्या कथांचे नाट्यरुपांतर शैलेश चव्हाण यांनी केले असून दिग्दर्शन कविता विभावरी यांचे आहे.