पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ
मुंबई दि.२९ :- पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील पोलीस भरतीसाठी आता येत्या १५ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
ऑनलाईन अर्ज भरताना सर्व्हर डाऊन असल्याने राज्यातील अनेक उमेदवारांना अर्ज सादर करण्यात अणचण आली होती. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलीस भरतीसाठी अर्ज भरताना नॉन क्रिमिलीअरच्या संदर्भात काही तक्रारी आल्या होत्या. गेल्या वर्षाचे नॉन क्रिमिलीअर प्रमाणपत्र यावर्षी मिळते. त्यामुळे मागील वर्षीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.