महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे बेमुदत उपोषण तात्पुरते स्थगित
प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा
नवी मुंबई दि.२९ :- महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ( संलग्न – भारतीय मजदुर संघ ) महावितरण वाशी मंडळ तर्फे विविध प्रलंबित मागण्यांविषयी सुरू करण्यात आलेले बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले आहे.
पनवेल खांदा कॉलनी येथील कामगार उपायुक्त कार्यालयासमोर सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले होते. दुपारी कामगार उपायुक्तांच्या कार्यालयात सहाय्यक कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी,महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे पदाधिकारी, महावितरणचे कंत्राटी कामगार, ठेकेदारांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली. कामगारांच्या विविध समस्या संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त शीतल कुलकर्णी यांनी ठेकेदारांना व ठेकेदार प्रतिनिधीना विविध सूचना केल्या.