येत्या ३ डिसेंबरपासून अपंग कल्याण विभागाचा स्वतंत्र कारभार
मुंबई दि.२९ :- येत्या ३ डिसेंबरपासून अपंग कल्याण विभागाचा प्रत्यक्ष कारभार सुरू होणार आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र अपंग कल्याण विभाग स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मान्यता दिली होती.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.