घाटकोपर आणि वर्सोवा स्थानकातून पहाटे साडेपाच वाजता पहिली फेरी
मुंबई दि.२९ :- घाटकोपर आणि वर्सोवा या दोन्ही स्थानकांतून आता पहाटे साडेपाच वाजता पहिली लोकल सुरू करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) घेतला आहे.
वर्सोवा आणि घाटकोपर या दोन्ही ठिकाणांहून याआधी पहिली फेरी सकाळी साडेसहा वाजता सुरू होत होती. मेट्रो-१ने पहिली फेरी पहाटे ५.३० वाजता सोडण्याचा निर्णय घेतल्याने वर्सोवा ते घाटकोपर आणि घाटकोपर ते वर्सोवा या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी सात फेऱ्या अतिरिक्त झाल्या आहेत.
घाटकोपर आणि वर्सोवा येथून सुटणा-या शेवटच्या गाडीच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. घाटकोपरहून अखेरची गाडी आता ११.४४ ऐवजी ११.४५ वाजता सुटेल तर वर्सोवा येथून अखेरची गाडी ११.१९ वाजता होती ती ११.२० वाजता असणार आहे.