ज्येष्ठ लावणी कलाकार मीना देशमुख यांचे निधन
सोलापूर दि.२८ :- ज्येष्ठ लावणी कलाकार मीना देशमुख यांचे अपघाती निधन झाले. त्या ६० वर्षांच्या होत्या. मोडलिंबकडून पंढरपूरकडे येत असताना काल (२७ नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
पंढरपूर ते कुर्डूवाडी रस्त्यावर रोपळे गावानजीक उजनी कालव्याच्या अरुंद पुलावरून जात असताना गाडीचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट ५० फूट खोल कालव्यात कोसळली. अपघातात मीना देशमुख यांची कन्या, नात आणि चालक गंभीर जखमी झाले.