गूढकथा संग्रह ‘केमिस्ट्री’ चे प्रकाशन
(ठाणे आसपास प्रतिनिधी)
ठाणे दि.२८ :- डिंपल पब्लिकेशन आणि अभिनय कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात कवी,चित्रकार रामदास खरे लिखित ‘केमिस्ट्री’ या गूढकथा संग्रहाचे प्रकाशन झाले. ठाण्यातील नौपाडा येथील अभिनय कट्ट्यावर झालेल्या कार्यक्रमात डॉ.वसुधा सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्रा. सुजाता राऊत प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.
अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती, डिंपल पब्लिकेशन चे सर्वेसर्वा अशोक मुळे यांनीही मनोगत व्यक्त केले. राजन मयेकर, स्मिता पोंक्षे, रामतीर्थ यांनी ‘केमिस्ट्री’ पुस्तकातील काही कथांचे अभिवाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यामिनी पानगावकर यांनी केले तर सायली खरे यांनी आभार मानले. डॉ मनाली खरे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.