भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी पी.टी. उषा बिनविरोध निवड, शिक्कामोर्तब बाकी
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२८ :- भारताच्या माजी धावपटू पी. टी. उषा या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) पहिल्या महिला अध्यक्ष होणार आहेत. ‘आयओए’च्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या रविवारच्या अखेरच्या दिवशी अध्यक्षपदासाठी केवळ पी.टी. उषाचा अर्जच दाखल झाला.
‘आयओए’ची निवडणूक येत्या १० डिसेंबरला होणार असून अध्यक्षपदासाठी केवळ उषा यांचाच दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित असून आता केवळ शिक्कामोर्तब बाकी आहे.