‘मनसे’ च्या आंदोलनांची माहिती देणारी पुस्तिका लवकरच प्रकाशित करणार – राज ठाकरे यांची माहिती
मुंबई दि.२८ :- ‘मनसे’ने आत्तापर्यंत केलेल्या विविध आंदोलनांची माहिती देणारी एक पुस्तिका लवकरच प्रकाशित केली जाईल, अशी माहिती ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी येथे केली. ही पुस्तिका प्रत्येक मनसे कार्यकर्त्यापर्यंत पोहोचविली जाणार असून पुस्तिकेत गेल्या १६ वर्षांत ‘मनसे’ने केलेली आंदोलने, ‘मनसे’ने ती आंदोलने कशी यशस्वी केली? याची माहिती देण्यात येणार आहे.
‘मनसे’ ने केलेल्या रेल्वे आंदोलनाला वेगळी दिशा दिली गेली. हे आंदोलन उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांविरोधात आहे,असा रंग या आंदोलनाला देण्यात आला. मात्र हे आंदोलन त्या राज्यातून जे लोक आले होते त्यांच्याविरोधात होते, असेही ठाकरे यांनी सांगितले.