थंडी पळाली! किमान तापमानात वाढ, दिवसा उकाडा
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२७ :- आग्नेय अरबी समुद्रात सध्या चक्रीय वातस्थिती निर्माण झाली असून कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ आणि दिवसा असह्य उकाडा अनुभवायला मिळाला.
मुंबईत कुलाबा येथे २४.६, तर सांताक्रूझ येथे २३ अंश सेल्सिअस किमान तापमान तर कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे ३२.८ तर सांताक्रूझ येथे ३४.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. वातावरणातील आर्द्रता तसेच वाढलेल्या तापमानाने शनिवारी उकाड्याची जाणीव मुंबईकरांना झाली.