अतिरेकी हल्ल्यातील हुतात्म्यांचे बलिदान
देश विसरणार नाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२६ :- मुंबईवर झालेल्या २६ /११ अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेले वीर जवान, पोलीस अधिकारी यांचे बलिदान देश विसरणार नाही, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.
२६ /११ अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेले वीर जवान, पोलीस अधिकारी तसेच नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘पाञ्चजन्य’ साप्ताहिकातर्फे आयोजित ‘२६/११ मुंबई संकल्प’ सभेचा समारोप राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी हॉटेल ताज महाल येथे झाला. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते.
जे लोक इतिहास विसरतात, त्यांना इतिहास विसरतो, त्यामुळे हुतात्म्यांना विसरू नये असे सांगताना मुंबई येथे हुतात्म्यांच्या स्मरणार्थ स्मृती सभेचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी पाञ्चजन्य साप्ताहिकाचे अभिनंदन केले.
२६ नोव्हेंबरचा अतिरेकी हल्ला हा देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला होता असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी भारत प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक भारत भूषण अरोडा, पाञ्चजन्यचे संपादक हितेश शंकर, उपसंपादक दिनेश मनसेरा व अश्वनी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.