मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संविधान प्रास्ताविकेचे वाचन
समता पर्वचा प्रारंभ, सहभागाचे आवाहन
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२६ :- संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन केले. या वाचन प्रसंगी मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
संविधान दिन ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत समता पर्व साजरा करण्यात येत आहे. या पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांत सहभागाचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन भारतीय संविधान दिनानिमित्त मंत्रालयामध्ये शनिवारी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करुन संविधान दिन साजरा करण्यात आला. माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव जयश्री भोज यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी उद्देशिकेचे वाचन केले.