बहुपत्नीत्व आणि निकाह हलालाच्या सुनावणीसाठी नवे घटनापीठ
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२५ :- मुस्लिम धर्मातील बहुपत्नीत्व आणि ‘निकाह हलाला’ या प्रथांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करण्यासाठी नव्या घटनापीठाची स्थापना केली जाणार आहे.
वकील अश्विनी उपाध्याय यांनी या विषयावर जनहित याचिका दाखल केली होती. याबाबतच्या सुनावणीसाठी पाच सदस्यांच्या नव्या घटनापीठाची स्थापना केली जाणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून सांगण्यात आले.
आधीच्या खंडपीठाचे इंदिरा बॅनर्जी, हेमंत गुप्ता हे दोन न्यायमूर्ती निवृत्त झाल्याने आता नव्या खंडपीठाची आवश्यकता असल्याची बाब उपाध्याय यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. हिमा कोहली, न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी नवे घटनापीठ स्थापन करण्यात येईल असे सांगितले.