साहित्य- सांस्कृतिक

यशवंतराव चव्हाण स्मृतिदिनानिमित्त त्यांनी लिहिलेल्या आणि त्यांच्यावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन

(मुंबई आसपास प्रतिनिधी)

मुंबई दि.२५ :- महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी लिहिलेल्या आणि त्यांच्यावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शनिवडक शंभर पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात आली असून यात सह्याद्रीचे वारे, युगांतर ,कृष्णाकांठ, ऋणानुबंध, विदेशदर्शन आदी पुस्तकांचा समावेश आहे.

हे प्रदर्शन मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या (दादर पूर्व ) संदर्भ विभागात येत्या ३०पर्यंत (२८ सोमवार सुट्टी वगळून) सकाळी १० ते संध्याकाळी ७ यावेळेत सुरू आहे.‌ अभ्यासक, वाचक,रसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन कार्यवाह उमा नाबर, ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *