पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रीगणेशा
(डोंबिवली आसपास प्रतिनिधी)
डोंबिवली दि.२४ डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या पुस्तक आदान प्रदान सोहळ्यास यंदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. उपक्रमाचा श्रीगणेशा त्यांनी स्वतः कडील बहुभाषिक पुस्तकांचे आदान करून केला. उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष आहे.
महाराष्ट्रात धर्मांतरबंदी आणि लव्ह जिहादविरोधी कायदा करा
येत्या २० ते २९ जानेवारी या कालावधीत डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात होणाऱ्या पुस्तक आदानप्रदान सोहळ्याचे निमंत्रण सार्वजनिक बांधकाम मंत्री, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पैं यांच्यासह उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मंगळवारी देण्यात आले.
वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयावर मोर्चा
फडणवीस यांनी तात्काळ या उपक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. फडणवीस यांनी स्वतः कडील दहा पुस्तकांचा संच तातडीने आदान म्हणून पै समूहाला दिला आणि त्याबदल्यात पै यांनीही त्यांना प्रदान स्वरूपात पुस्तके दिली.
देशाच्या उभारणीत तरुणांच्या कौशल्याचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाचे प्राधान्य