मुंबई मेट्रो १ चे तिकीट आता ‘व्हाट्सएपवर’
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२४ :- मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडचे (एम एमओपीएल) तिकीट आता ‘व्हाट्सएपवर’ उपलब्ध होणार आहे. गुरुवारपासून या सेवेला सुरूवात झाली. प्रवाशांना तिकीट खिडकीवर जावे लागू नये यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने याआधी ई तिकीट सेवा सुरू केली आहे.
आता व्हाट्सअपवर ई-तिकीट क्युआर (क्विक रिस्पॉन्स) कोडच्या रूपात वितरित केले जाणार आहे. ९६७०००८८८९ या व्हाट्सअप क्रमांकावर ‘हाय’ असा संदेश पाठविल्यानंतर एक लिंक पाठविली जाणार आहे. या लिंकवर पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑनलाइन पेमेंटद्वारे ई-तिकीट घेता येणार आहे. मेट्रो १ मधून दिवसभरात साडेतीन लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.
अंधेरी येथील गोखले पूल वाहतुकीसाठी बंद झाल्यापासून प्रवासीसंख्या २० हजाराने वाढली असल्याचे सांगण्यात येते. मेट्रो १ च्या घाटकोपर ते वर्सोवा या प्रवासी सेवेला पहिल्यापासूच प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे.