ठळक बातम्या

सार्वजनिक बिगर कृषिविद्यापीठांच्या कुलगुरुंची राजभवन येथे बैठक

मुंबई दि.२४ :- राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक बिगर कृषिविद्यापीठांच्या कुलगुरुंची संयुक्त बैठक मुंबईत राजभवन येथे आयोजित करण्यात आली होती.

राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये युवा मतदारांमध्ये जागरुकता, विद्यापीठांचे राष्ट्रीय मानांकन सुधारणे यांसह विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच विद्यापीठांचे कुलगुरु व प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *