‘कांतारा’ चित्रपट अॅमेझॉन प्राईम ओटीटीवर प्रदर्शित
मुंबई दि.२४ :- अभिनेता- दिग्दर्शक रिषभ शेट्टी यांचा बहुचर्चित ‘कांतारा’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर गुरुवारी प्रदर्शित झाला. जगभरात या चित्रपटाने ४०० कोटींची कमाई केली आहे. ‘कांतारा’ चित्रपट गेल्या आठवड्यातच ओटीटीवर प्रदर्शित होणार होता.
मात्र तो चित्रपटगृहात चालत असल्याने ओटीटीवर प्रदर्शित करण्याची तारीख पुढे ढकलली होती. आता २४ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ओटीटीवर अद्यापही हिंदीत उपलब्ध नसून सध्या हा चित्रपट केवळ कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्ये उपलब्ध आहे.