महापालिकेतर्फे न्युमोनिया आजार प्रतिबंध मोहीम
मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई, दि,२३ केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे न्युमोनिया प्रतिबंधक मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.
काशी कॉरिडॉर प्रमाणे पंचवटी – त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर विकसित व्हावा
या उपक्रमात महानगरपालिकेचे दवाखाने, प्रसुतिगृह, उपनगरीय रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालये येथे येणा-या बाह्यरुग्ण विभागातील बालकांची तपासणी, उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
डेन्मार्क राज्यात दुग्ध उत्पादनातील सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणार
खोकला, सर्दी वाढणे, श्वासोच्छवास वेगाने होणे, ताप येणे आदी लक्षणे लहान बालकांत आढळून आल्यास पालकांनी अधिक उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्र, दवाखाना, प्रसुतिगृह व रुग्णालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.
देशाच्या उभारणीत तरुणांच्या कौशल्याचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाचे प्राधान्य