महाराष्ट्रात धर्मांतरबंदी आणि लव्ह जिहादविरोधी कायदा करा
-आळंदी येथील १६ व्या वारकरी महाअधिवेशनात मागणी
आळंदी, दि, २३ महाराष्ट्रात धर्मांतरबंदी आणि लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात यावा, गड आणि दुर्ग यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवावी असे ठराव येथे मंजूर करण्यात आले.
काशी कॉरिडॉर प्रमाणे पंचवटी – त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर विकसित व्हावा
श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी येथे १६ वे राज्यव्यापी वारकरी महाअधिवेशन श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा येथे आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनात वरील ठराव मंजूर करण्यात आले.
आफतबाच्या पॉलिग्राफ चाचणीला न्यायालयाकडून परवानगी
मुलींवर चांगले संस्कार केल्यास आणि त्यांना धर्मशिक्षण दिल्यास त्या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडणार नाहीत. हिंदूंनी पक्ष आणि जाती यांमध्ये न अडकता भारतीय म्हणून संघटित झाले पाहिजे. असे आवाहन अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) यांनी यावेळी बोलताना केले.
चार बांगलादेशी नागरिकांना अटक मुंबईत बेकायदा वास्तव्य
सर्व तीर्थक्षेत्री मद्य आणि मांस विक्रीवर बंदी घालावी, पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रांयणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी, सर्व मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त करावीत, बियरबार, मटण दुकानांना देवता आणि गडकोटांची नावे देऊ नयेत, महाराष्ट्रात गोसंवर्धन आयोगाची स्थापना करण्यात यावी, हलाल शिक्का असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा आदी ठराव यावेळी मंजूर करण्यात आले. या ठरावांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे.
नराधम ‘लव्ह जिहादीं’ना तात्काळ फासावर लटकवा !
अधिवेशनात ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदासजी महाराज लहवितकर, हिंदूभूषण श्यामजी महाराज, योगीदत्तनाथ महाराज, ह. भ. प. गोपाळ महाराज वक्ते, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह. भ. प. मारुती महाराज तुनतूने शास्त्री ह. भ. प. भगवान महाराज कोकरे, मिलिंद एकबोटे , विजय वरुडकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक सुनील घनवट यांचीही भाषणे झाली.
हिंदुद्वेषी हास्यकलाकार वीर दास, मुनव्वर फारूकी यांचे मुंबईतील कार्यक्रम रद्द