करोना काळातील महापालिका खर्चाच्या चौकशीला ‘कॅग’ पथकाकडून सुरुवात
मुंबई, दि,२३ करोना काळातील बृहन्मुंबई महापालिकेच्या व्यवहारांच्या चौकशीला ‘कॅग’च्या पथकाकडून सुरुवात करण्यात आली आहे. दहा अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी सकाळी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली, असे सांगण्यात आले.
‘अमृत महाआवास’ राज्यस्तरीय योजनेचा उद्या शुभारंभ
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये करोना काळात झालेल्या १२ हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या कामांचे ‘कॅग’द्वारे विशेष लेखापरिक्षण करण्यात येणार आहे. राज्य सरकारने ‘कॅग’ला पाठविलेल्या प्रस्तावानुसार महापालिकेत २८ नोव्हेंबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीतील कामकाजाचे परिक्षण केले जाणार आहे.
करोना काळात महापालिकेत निविदा न मागवता कंत्राटे देण्यात आल्याचा आरोप आहे.