बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रयोग शाळेस राष्ट्रीय मानांकन -बांधकाम साहित्याच्या नमुन्यांची चाचणी करुन दर्जा तपासण्याची सुविधा
मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई, दि, २३ बृहन्मुंबई महापालिकेच्या साहित्य चाचणी प्रयोगशाळेला राष्ट्रीय मानांकनाचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या ‘राष्ट्रीय परीक्षण अंश-शोधन प्रयोगशाळा आणि मान्यता मंडळ’ संस्थेकडून प्रयोगशाळेची तपासणी करण्यात आली.
महापालिकेतर्फे न्युमोनिया आजार प्रतिबंध मोहीम
बृहन्मुंबई महापालिकेकडून विकासाची अनेक नवीन कामे तसेच दुरुस्ती / देखभालीची कामे करण्यात येतात. या कामांमध्ये वापरण्यात येणा-या साहित्य सामुग्रीची तपासणी करण्यासाठी प्रमुख अभियंता (दक्षता) विभागाच्या देखरेखीखाली महापालिकेची प्रयोगशाळा वरळी येथे १९५८ पासून कार्यरत आहे.
डेन्मार्क राज्यात दुग्ध उत्पादनातील सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणार
प्रयोग शाळेमध्ये सिमेंट, सळई / लोखंड, खडी, विटा, रेती, लाकूड, लादी, डांबर, असफाल्ट, काँक्रिट इत्यादी बांधकाम साहित्याच्या नमुन्यांची चाचणी करुन दर्जा तपासण्यात येतो. यासाठी प्रयोगशाळेमध्ये अनेक प्रकारच्या यंत्रसामुग्री / मशीन्स, तंत्रज्ञान उपलब्ध असून त्यासाठी अभियंते व तंत्रज्ञ कार्यरत आहेत.
मध्य आशियाई देशातील ८५ युवकांनी घेतली राज्यपालांची भेट
नजीकच्या भविष्यकाळात चाचणी कामासाठी अनेक अत्याधुनिक यंत्र सामुग्री, उपकरणे व तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात येणार असून बांधकाम साहित्यासाठी नवीन १५० चाचण्या वाढविण्यात येणार आहेत.
लोकमान्य टिळकांची चरित्रगाथा झी मराठीवर
महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेत करण्यात येणा-या साहित्य चाचणीची यादी व त्यासाठी शुल्क रक्कमेचा तक्ता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या www.portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपल्ब्ध असून ती यादी वेळोवेळी अद्यावत करण्यात येते. महानगरपालिकेच्या साहित्य चाचणी प्रयोगशाळेचा लाभ इतर संस्थांनाही घेता येणार आहे.
काशी कॉरिडॉर प्रमाणे पंचवटी – त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर विकसित व्हावा