सामाजिक

‘अमृत महाआवास’ राज्यस्तरीय योजनेचा उद्या शुभारंभ

मुंबई आसपास प्रतिनिधी
मुंबई, दि.‌ २३ भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ‘अमृत महाआवास अभियान’ राबविण्यात येणार आहे.‌ याचा शुभारंभ उद्या गुरुवारी (२४) मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.

काशी कॉरिडॉर प्रमाणे पंचवटी – त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर विकसित व्हावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
संपूर्ण राज्यात राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत महाआवास अभियान’ उपक्रमात पाच लाख गरीब, बेघर आणि भूमिहीन लाभार्थ्यांच्या घरकुलांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

डेन्मार्क राज्यात दुग्ध उत्पादनातील सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणार

अभियान कालावधीत भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे, मंजूर घरकुलांना सर्व हप्ते वेळेत वितरीत करणे, इंदिरा आवास योजनेंतर्गत उर्वरित सर्व घरकुले पूर्ण करणे, नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे आदी कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच सर्वात कमी करोना रुग्णांची नोंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *