पर्यटन

काशी कॉरिडॉर प्रमाणे पंचवटी – त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर विकसित व्हावा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन
मुंबई, दि, २२ काशी आणि अयोध्येच्या पुनरुत्थानाप्रमाणेच राज्यातील पंचवटी – त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर विकसित व्हावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

गोव्यातील आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात आठ मराठी चित्रपट

केंद्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्लीतर्फे मंगळवारी गिरगाव चौपाटी येथील भारतीय विद्या भवनाच्या सभागृहात ‘भारतीय बौद्धिक संपदा व सांस्कृतिक वारशाचे नवे आयाम’ या विषयावरील ‘विकास यात्रा’ या  एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.‌ त्यावेळी राज्यपाल कोश्यारी बोलत होते.

देशाच्या उभारणीत तरुणांच्या कौशल्याचा वापर करण्यासाठी केंद्र शासनाचे प्राधान्य

आजकाल आपण केवळ रस्ते, शाळा, रुग्णालय, वीज पुरवठा याला विकास मानतो. परंतु भौतिक प्रगतीच्या पुढे जाऊन मन, बुद्धी व आत्म्याचा विकास होणे ही विकासाची परिभाषा आहे. पारतंत्र्यात अनेक वर्षे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, राणाप्रताप आदी अनेक थोर महापुरुषांच्या प्रयत्नामुळे भारत आज पुन्हा एकदा जगात स्वाभिमानाने उभा आहे. जगातील लोकांना भारत जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली आहे.  या पार्श्वभूमीवर मातृभाषा, संस्कृती व संस्कार जपले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

डेन्मार्क राज्यात दुग्ध उत्पादनातील सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करणार

भारतीय विद्या भवनच्या मुंबादेवी आदर्श संस्कृत महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित या चर्चासत्राच्या उदघाटनाला केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ श्रीनिवास वरखेडी, श्री करपात्री धाम वाराणशीचे पीठाधीश स्वामी अभिषेक ब्रह्मचारी, युवा चेतनाचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह, भवनच्या संस्कृत अध्ययन केंद्राचे संचालक डॉ गिरीश जानी, प्रभारी प्राचार्य डॉ गणपती हेगडे, विद्यार्थी व प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते चर्चासत्राच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

आधार कार्ड पॅन कार्डला जोडण्याची शेवटची तारीख ३१ मार्च

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *