दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच सर्वात कमी करोना रुग्णांची नोंद
२४ तासांत अवघे २९४ करोना रुग्ण
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२२ :- भारतात मार्च २०२० नंतर सोमवारी (२१ नोव्हेंबर २०२२) पहिल्यांदाच सर्वात कमी करोना रुग्णांची नोंद झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी ही माहिती देण्यात आली.
देशात गेल्या २४ तासांत अवघे २९४ नवे करोनाबाधित आढळले असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाच्या उपचाराधिन रुग्णांची संख्याही घटली आहे. देशात सध्या ६ हजार २०९ करोना रुग्ण उपचार घेत आहेत.