आफतबाच्या पॉलिग्राफ चाचणीला न्यायालयाकडून परवानगी
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२२ :- नोव्हेंबर श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याच्या पॉलिग्राफ चाचणीला न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान आफताबला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
श्रद्धा हत्या प्रकरणी आफताबला १२ नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती.