आधार कार्ड पॅन कार्डला जोडण्याची शेवटची तारीख ३१ मार्च
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२१ :- आधार कार्ड पॅन कार्डला जोडण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ अशी असून नंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्याबाबत आयकर विभागाने सूचना दिल्या होत्या. आता या प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्यास आयकर विभागाने नकार दिला आहे. येत्या ३१ मार्च २०२३ पर्यंत आधार कार्ड पॅनकार्डला जोडण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.