हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.२१ :- हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे (मुंबई शहर) हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर येथे हा कार्यक्रम झाला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा,मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, शंराजगुरु स्मारकाचे सदस्य सत्यशील राजगुरू, उमा संजीव महादेकर, स्मारक निर्मिती ग्रुपचे ॲड. प्रथमेश पाडेकर आदी उपस्थित होते.