‘रसना’ चे संस्थापक अरीज खंबाटा यांचे निधन
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२१ :- ‘रसना’ चे संस्थापक अरीज पिरोजशॉ खंबाटा यांचे शनिवारी निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. ‘रसना’
कंपनीकडून ही माहिती देण्यात आली. खंबाटा हे अहमदाबाद पारशी पंचायतीचे माजी अध्यक्ष होते. त्याशिवाय पारशी-इराणी झोराष्ट्रीयन समुदायाची संघटना असलेल्या (WAPIZ) या संघटनेचेही अध्यक्ष होते.
फळांवर आधारित उत्पादने विकसित केल्यामुळे देशातील लाखो शेतकर्यांना त्याचा फायदा झाला. त्यांना बाजारपेठ मिळाली आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीलाही योग्य मोबदला मिळाला, असे कंपनीने म्हटले आहे.
१९७० च्या दशकात महागड्या शीतपेयांना पर्याय म्हणून खंबाटा यांनी ‘रसना’ची सुरुवात केली. सध्या ‘रसना’ जगभरातील ६० देशांमध्ये विकले जाते. विविध संस्था, धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून खंबाटा सामाजिक कार्यातही अग्रसेर होते.