जाकार्ताला भूकंपाचा धक्का २० जणांचा मृत्यू, ३०० जखमी
वृत्तसंस्था
जाकार्ता दि.२१ :- इंडोनेशियाची राजधानी जकार्ताला भूकंपाचा धक्क बसला आहे. हा भूकंप ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. यात २० जणांचा मृत्यू आणि ३०० जण जखमी झाले. या भूकंपामुळे त्सुनामीचा धोका नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
राजधानी जकार्तापासून सुमारे ७५ किलोमीटर पश्चिम दिशेला असलेले सियांजूर हे भूकंपाचे केंद्र होते. ५.६ रिश्टर सेलच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली सुमारे १० किलोमीटर होता. अनेक इमारतींचेही नुकसान झाले आहे.