चार बांगलादेशी नागरिकांना अटक मुंबईत बेकायदा वास्तव्य
मुंबई दि.२० :- मुंबईत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना मुंबई पोलिसांनी अटक केली.आहे. सोहेल जलील शेख, मेहबूब अहमद शेख, मोहीन शादत खान, रिकन उत्तमकुमार चकमा अशी त्यांची नावे आहेत.
मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. त्यात मेहबूब शेख आणि मोहीन खान या दोघांना अटक केली. नळ जोडणीचे काम करणारा मेहबूब हा माझगाव परिसरात राहात होता. त्याच्याकडून पोलिसांनी भारतीय, बांगलदेशी चलन, एक भ्रमणध्वनी जप्त केला आहे.
अन्य एका कारवाईत रिकन चकमा या बांगलादेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली. तो विदेशात जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्या पारपत्राची पाहणी केल्यानंतर ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले. अन्य एका घटनेत देवनार पोलिसांनी सोहेल जलील शेख याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.