राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या डोळ्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२० :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या डाव्या डोळ्यावर रविवारी सकाळी सैनिकी रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. अशी माहिती राष्ट्रपती भवनाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही तासांनी राष्ट्रपती मुर्मू यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. राष्ट्रपती मुर्मू यांच्या उजव्या डोळ्यावर १६ ऑक्टोबर रोजी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती,असेही या पत्रकात म्हटले आहे.