राज्यातील सर्व शाळा लवकरच डिजिटल होणार
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती
ठाणे दि.२० :- राज्यभरात डिजिटल शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भिवंडी येथे दिली.
राज्य शासनाच्या ‘माझी ई शाळा’ या उपक्रमाची सुरुवात भिवंडी येथे झाली त्यावेळी केसरकर बोलत होते. प्रथम इन्फोटेक फाउंडेशन, ठाणे जिल्हा परिषद आणि राज्य शासनाचा समग्र शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने काल्हेर जिल्हा परिषदेच्या शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास हा महत्त्वाचा असून राज्यातील सर्व शाळा उपग्रहाच्या माध्यमातून जोडण्यात येणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले.