संशयित गोवर रुग्णांची संख्या अडीच हजारांहून अधिक – नऊ जणांचा मृत्यू
मुंबई दि.१९ :- मुंबईतील गोवर रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून शुक्रवारी संशयित रुग्णसंख्या २ हजार ८६० झाली. १७६ रुग्णांना गोवरची लागण झाली आहे. एका बालकाचा मृत्यू झाल्याने संशयित मृतांची संख्या नऊ झाली आहे.
मृत बालक भिवंडी येथील असून, त्याला ७ नोव्बरपासून ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत होता. १७ नोव्हेंबरला बृहन्मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
मुंबईमध्ये दोन महिन्यांपासून गोवरचा उद्रेक झाला आहे. १८ नोव्हेंबरला ३२ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले असून, ७ नोव्हेंबरपासून आतापर्यंत १३७ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. ४ नोव्हेंबरपासून आतापर्यंत ४६ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.