माजी महापौर किशोरी पेडणेकरांशी संबंधित चार सदनिका ताब्यात घेणार
‘झोपु’ प्राधिकरणाचे महापालिकेला आदेश
मुंबई दि.१९ :- ‘झोपु’ योजनेतील माजी महापौर किशोरी पेडणेकरांशी संबंधित चार सदनिका ताब्यात घेतल्या जाणार आहेत. या चार सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश ‘झोपू’ प्राधिकरणाने महापालिकला दिले असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.
वरळीतील ‘झोपु’ योजनेतील चार सदनिका पेडणेकर यांनी बळकावल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता त्यांनी यासंदर्भात झोपु’ प्राधिकरणाकडे तक्रारही केली होती.
प्राधिकरणाच्या कलम ‘३ अ’नुसार मूळ लाभार्थी/सदनिकाधारकाला १० वर्षे सदनिका भाड्याने देता येत नाही. याप्रकरणात कलम ‘३ अ’चे उल्लंघन झाल्याचे ‘झोपु’ प्राधिकरणाच्या चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे आता मूळ भाडेकरूंविरोधात निष्कासनाची कारवाई करून सदनिका ताब्यात घेण्यात येणार आहेत.