ठळक बातम्या

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या श्रीहरीकोटा केंद्रावरून पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

वृत्तसंस्था

श्रीहरीकोटा दि.१८ :- भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने नवा इतिहास रचला असून ‘इस्रो’च्या श्रीहरीकोटा केंद्रावरून पहिल्या खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. अवकाशात १०० किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर हे रॉकेट समुद्रात कोसळणार असून रॉकेटचे वजन ५४५ किलो इतके आहे.

सकाळी साडेअकरा वाजता सतीश भवन अंतराळ केंद्रावरून रॉकेटने यशस्वी झेप घेतली. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांचे नाव या रॉकेटला दिले आहे. या रॉकेटचं नाव विक्रम सबऑर्बिटल असे आहे.

जास्तीत जास्त १०१ किलोमीटरपर्यंतचाच प्रवास करेल इतकीच याची क्षमता ठेवण्यात आली आहे.‌ त्यामुळेच शुक्रवारी प्रक्षेपण झालेले हे रॉकेट १०० किलोमीटर अंतर पार करून समुद्रात कोसळणार आहे. हैदराबादमधील ‘स्कायरूट एरोस्पेस’ या कंपनीने २०२० मध्ये या रॉकेटच्या निर्मितीला सुरुवात केली होती. ही कंपनी स्टार्ट अप योजनेंतर्गत सुरू झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *