मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भीषण अपघातात
५ जण ठार, २ जण गंभीर जखमी
मुंबई दि.१८ :- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. बोरघाटात झालेल्या अपघातात चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला. आहे. हा अपघात मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर झाला. मृत आणि गंभीर प्रवाशांची नावे कळू शकली नाहीत.
जखमी प्रवाशांना नवी मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.