स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी मुंबईसाठी सरकार प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे लोकार्पण
मुंबई, दि. १७ – मुंबई शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी व्हावे असे धोरण आहे. यात धारावीचा पुनर्विकास हा महत्त्वाचा असून, येत्या काही काळात जगाचे लक्ष वेधून घेईल अशी वसाहत प्रत्यक्षात येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.
बृहन्मुंबई महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण योजने अंतर्गत कार्यान्वित बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
महापालिकेच्या बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या लोकार्पण
धारावी परिसरातील संत रोहिदास मार्गावरील काळा किल्ला येथील दवाखान्याचे प्रत्यक्ष तसेच अन्य ठिकाणच्या ५१ दवाखान्यांचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण झाले. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन आता दुप्पट
मुंबईतील कुणाही गरजूला वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत, असे होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यात येत असून राज्यातील ग्रामीण भागातही मुंबईतील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा विस्तार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्क्यांनी वाढ
याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला ‘वारसा विचारांचा’ परिसंवाद
योजनेत पहिल्या टप्प्यात ५२ दवाखाने सुरु करण्यात येत असून पुढील सहा महिन्यात २० पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर यासह १४९ ठिकाणी दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत. या दवाखान्यात मोफत वैद्यकीय तपासणी, औषध उपचार व किरकोळ जखमांवर मलमपट्टी, तसेच १४७ प्रकारच्या रक्त चाचणी मोफत पुरवण्यात येणार आहेत याव्यतिरिक्त एक्स-रे, सोनोग्राफी, इत्यादी चाचण्या करिता पॅनल वरील डायग्नॉस्टीक केंद्राद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरात करण्यात येतील.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नियोजित स्मारकाच्या कामाची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पाहणी
पोर्टा केबिन मधील दवाखाने हे सकाळी ७ ते दुपारी २, त्यानंतर दुपारी ३ ते रात्री १० या कालावधी दरम्यान कार्यरत असणार आहेत. तर उपलब्ध दवाखान्यांमध्ये सुरु करण्यात आलेले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने हे सकाळी ९ ते दुपारी ४ आणि दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत सुरु करण्यात येत आहेत.
कर्नाक उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी मध्य रेल्वेवर २७ तासांचा मेगाब्लॉक