प्रेयसीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रकरणी प्रियकरला अटक
बोरीवली येथील घटना, दहिसर पोलिसांकडून पुढील तपास
मुंबई दि.१८ :- इमारतीच्या टाकीवरून प्रेयसीला खाली ढकलून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्या-या अमेय दरेकर या प्रियकराला दहिसर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या प्रियांगी सिंह हिला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रियांगीचे वडील मुनिश सिंह यांनी यासंदर्भात दिंडोशी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी दहिसर पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :- श्रद्धा वालकर हत्या प्रकरण आणखी किती श्रद्धांचा बळी जाणार?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अमेय दरेकर आणि जखमी तरुणी प्रियांगी सिंह हे दोघेही एकमेकांशी परिचित असून त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत. रविवारी रात्री प्रियांगी अमेयला भेटण्यासाठी बोरीवली इथे त्याच्या निवासस्थानी गेली होती. तिथे त्यांच्यात वाद झाला. चिडलेल्या अमेयने प्रियांगीला इमारतीच्या टाकीवरुन धक्का मारुन खाली ढकलले. यावेळी दोघांनीही मद्यपान केले होते. रविवारी ही घटना घडली.
हेही वाचा :- ‘मला काय त्याचे’ ही वृत्ती हिंदूंनी सोडावी
दरम्यान या घटनेनंतर दरेकर आणि सिंह कुटुंबीयांकडून पोलिसांकडे परस्पर विरोधी दावे- प्रतिदावे करण्यात आले आहेत. प्रियांगीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि घडलेल्या प्रकाराशी अमेयचा संबंध नाही, असे दरेकर कुटुंबाचे म्हणणे आहे. तर माझी मुलगी इमारतीवरुन कोसळली नाही किंवा तिने आत्महत्या केली नाही, असे सिंह यांचे म्हणणे आहे.