‘सागरमाला’ योजनेअंतर्गत राज्यातील चार नव्या जेट्टी प्रकल्पांना मंजुरी
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१८ :- केंद्र सरकारने ‘सागरमाला’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील चार नवीन जेट्टी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लब अपोलो बंदर, जंजीरा बंदर, पद्मदुर्ग बंदर आणि सुवर्णदुर्ग येथील बंदरांचा समावेश असल्याची माहिती बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी दिली.
हेही वाचा :- अबू आझमींशी संबंधित २० हून अधिक ठिकाणी आयकर विभागाची धाड
राज्यातील बंदरांचा विकास करण्यासंदर्भात ११ सप्टेंबर २०२२ रोजी केंद्रीय पत्तन, पोत परिवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बांनंद सोनोवाल यांना भुसे यांनी विनंती केली होती. राज्य सरकारच्या प्रस्तावाला तत्काळ प्रतिसाद देत केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी या चारही प्रकल्पांना मंजुरी दिली.
हेही वाचा :- स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी मुंबईसाठी सरकार प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
‘सागरमाला’ प्रकल्पांच्या खर्चामध्ये ५० टक्के खर्च राज्य सरकार आणि ५० टक्के केंद्र सरकार करणार आहे. केंद्र सरकारने या चार प्रकल्पासाठी ३१२ कोटी रूपये मंजूर केल्याचेही भुसे यांनी सांगितले.