राहुल गांधी यांच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे दि.१८ :- काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना डोंगरे यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती.
‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे नागरिकांच्या भावना दुखाविल्या गेल्या असल्याचे डोंगरे यांनी या तक्रारीत म्हटले आहे.