१२ डब्यांच्या २६ उपनगरी गाड्या आता १५ डब्यांच्या
पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना दिलासा
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१८ :- पश्चिम रेल्वेवरील १२ डब्यांच्या २६ उपनगरी गाड्या आता १५ डब्यांच्या चालविण्यात येणार आहेत. यात जलद मार्गावरील १० गाड्यांचा समावेश आहे.येत्या २१ नोव्हेंबरपासून त्या धावणार आहेत.
बारा डब्यांच्या लोकल पंधरा डब्यात रूपांतरित केल्यामुळे प्रत्येक लोकलची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे. या निर्णयाने पंधरा डब्याच्या लोकलच्या फेऱ्यांची एकूण संख्या १०६ वरून १३२ होणार आहे. पश्चिम रेल्वेवर १२ डब्यांची पहिली उपनगरी गाडी १९८६ मध्ये तर १५ डब्यांची पहिली उपनगरी गाडी २००६ मध्ये धावली होती.