बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१७ :- दिवंगत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्मारकाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
हे स्मारक जनतेला प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्मारकाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. या पाहणीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्मारकाच्या कामासंदर्भात एक आढावा बैठकही घेतली. मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहूल शेवाळे, ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त एस.व्ही.आर श्रीनिवास यावेळी उपस्थित होते.