नारायण राणे यांच्याकडूनच बंगल्याच्या पाडकामाला सुरुवात
(मुंबई आसपास प्रतिनिधी)
मुंबई दि.१७ :- मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील ‘अधीश’ बंगल्याच्या पाडकामाला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. दस्तुरखुद्द राणे यांच्याकडूनच हे पाडकाम केले जात असल्याचे सांगण्यात येते.
राणे यांच्या या बंगल्यात अनाधिकृत बांधकाम झाल्याचे समोर आल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी राणेंना नोटिस पाठविली. मुंबई उच्च न्यायालयाने बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित होऊ शकत नाही, असे सांगत हे बांधकाम पाडण्याचा आदेश तसेच राणे यांना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता.
या निर्णयाविरोधात नारायण राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि बांधकाम स्वतः पाडण्याचे आदेश दिले होते.